Ad will apear here
Next
लुइझा मे अॅल्कॉट
अमेरिकन सिव्हिल वॉरच्या पार्श्वभूमीवर मेग, ज्यो, बेथ आणि अॅमी अशा ‘मार्च’ कुटुंबातल्या चार बहिणींची अतिशय हृद्य आणि विलोभनीय अशी कौटुंबिक कहाणी लिहिणाऱ्या लुइझा मे अॅल्कॉटचा २९ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिच्याविषयी...
........
२९ नोव्हेंबर १८३२ रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये जन्मलेली लुइझा अॅल्कॉट ही जगभर लोकप्रिय झाली ती तिच्या ‘लिटल विमेन’या पहिल्याच कादंबरीने!

आधी बॉस्टन आणि नंतर कॉन्कॉर्डला वास्तव्य असताना तिला राल्फ इमर्सन, पार्कर आणि हेन्री डेव्हिड थोरोसारख्या ख्यातनाम लेखकांचा आणि विचारवंतांचा सहवास लाभला. 

सुरुवातीला तिनं कथालेखिका म्हणून नाव कमावलं; पण त्यानंतर १८६८-६९च्या सुमाराला तिनं लिहिलेल्या ‘लिटल विमेन’ह्या कादंबरीला अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. (आपल्याकडे शांताबाई शेळके यांनी त्याचा ‘चौघीजणी’ नावानं फार सुंदर अनुवाद केला आहे)

अमेरिकन सिव्हिल वॉरच्या पार्श्वभूमीवर रंगणारी ही मेग, ज्यो, बेथ आणि अॅमी अशा ‘मार्च’ कुटुंबातल्या चार बहिणींची कहाणी! त्या व्यक्तिरेखा लुइझा अॅल्कॉटने स्वतः आणि स्वतःच्या बहिणींवरून रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी ही कथा जास्तच खुलते. एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय अशी ही कौटुंबिक कहाणी. चारही बहिणींचं एकमेकांवरचं उत्कट प्रेम, त्यांच्या आशा-आकांक्षा, सुखदु:खं, स्वप्नं यांचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण आपल्याला गुंतवून ठेवतं. या कादंबरीवर अनेक सिनेमे बनले; पण १९४९चा जून अॅलीसन, मार्गारेट ओब्रायन, लीझ टेलर आणि जेनेट ली चा सिनेमा खूप गाजला होता.
 
जोज बॉइज, लिटल मेन, एट कझिन्स, अॅन ओल्ड फॅशन्ड गर्ल, रोज इन ब्लुम, फ्लॉवर फेबल्स, दी इन्हेरिटन्स अशी तिची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

सहा मार्च १८८८ रोजी तिचा बॉस्टनमध्ये मृत्यू झाला. 



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZOHBI
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language